सलमानच्या हिरोईनने १० वर्षांच्या करिअरमध्ये एकही दिला नाही हिट सिनेमा, तरीदेखील आहे करोडोंची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:26 IST2025-01-27T11:22:32+5:302025-01-27T11:26:43+5:30

आज आम्ही तुम्हाला सिनेइंडस्ट्रीतील अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने टीव्ही शोमधून खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली, पण तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये एकही हिट देऊ शकली नाही. असे असतानाही तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झाली नाही. इतकेच नाही तर एकही हिट न देता ही अभिनेत्री आहे करोडोंची मालकीण.

आज आम्ही तुम्हाला सिनेइंडस्ट्रीतील अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने टीव्ही शोमधून खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली, पण तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये एकही हिट देऊ शकली नाही. असे असतानाही तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झाली नाही. इतकेच नाही तर एकही हिट न देता ही अभिनेत्री आहे करोडोंची मालकीण.

२७ जानेवारी, १९९३ रोजी पंजाबमधील बियास येथे जन्मलेल्या या अभिनेत्रीने २०१५ मध्ये एका म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने चित्रपट, गाणी आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिला नाव आणि प्रसिद्धी मिळाली असेल पण यशस्वी अभिनेत्री म्हणून तिला अजून मिळालेले नाही. एवढेच नाही तर तिला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते जी आज बॉलिवूडची प्रसिद्ध स्टार बनली आहे. होय, आम्ही शहनाज गिलबद्दल बोलत आहोत.

शहनाज गिलला 'बिग बॉस १३' मधून खूप लोकप्रियता मिळाली. फार कमी लोकांना माहित असेल की शहनाजने बालपणीच अभिनेत्री व्हायचं ठरवलं होतं. मात्र या निर्णयाने तिचे कुटुंब अजिबात खूश नव्हते. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहनाजने वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडले आणि पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.

शहनाजचा इथला मार्ग सोपा नव्हता. सुरुवातीला तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण तिने हार मानली नाही आणि आपल्या मेहनतीने या इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले.

शहनाजचा पहिला म्युझिक अल्बम 'शिव दी किताब' होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही आणि अनेक पंजाबी गाणी आणि चित्रपटांमध्ये काम केले. तिने 'सत श्री अकाल इंग्लंड' (२०१७), 'काला शाह काला' (२०१९) आणि 'डाका' यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले.

याशिवाय शहनाजने 'वेहम', 'फुटपाथ', 'रेंज', 'रोंडा अली पट्टी', 'भुला दूंगा', 'कह गई सॉरी', 'कुर्ता पायजमा', 'वादा है' आणि 'शोना शोना' 'गाण्यांसह अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे.

शहनाजने पंजाबी सिनेमात खूप नाव कमावले आणि त्यानंतर ती सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १३'मध्ये सहभागी झाली. या शोमध्ये दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची मैत्री लोकांना खूप आवडली.

त्यानंतर शहनाजने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी शहनाजने आपली छाप पाडली.

शहनाज भूमी पेडणेकरच्या 'थँक्स फॉर कमिंग' या चित्रपटातही दिसली. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता शहनाज लवकरच 'सब फर्स्ट क्लास' या चित्रपटात दिसणार असून याशिवाय तिचा एक पंजाबी चित्रपटही आहे.

शहनाजच्या नेट वर्थबद्दल सांगायचे, तर तिने स्वत: करोडो रुपये कमावले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज ३३ कोटींची मालकीण आहे. शहनाजची वार्षिक कमाई जवळपास ३ कोटी रुपये आहे.

इतकेच नाही तर ती एका सोशल मीडिया पोस्टसाठी १० लाख रुपये घेते. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.