Riddhi Dogra : "लीड रोल मिळवण्यासाठी छोट्या कपड्यात करू शकत नाही डान्स", रिद्धी डोगराने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:47 IST2024-12-25T13:41:17+5:302024-12-25T13:47:22+5:30

Riddhi Dogra : रिद्धीने शाहरुख खानच्या 'जवान'पासून ते विक्रांत मॅसीच्या 'द साबरमती रिपोर्ट'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

रिद्धी डोगरा हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आता ती बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये दिसत आहे. रिद्धीने शाहरुख खानच्या 'जवान'पासून ते विक्रांत मॅसीच्या 'द साबरमती रिपोर्ट'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

रिद्धी डोगरा तिच्या चित्रपटांची निवड खूप विचारपूर्वक करते. द इंडियन एक्स्प्रेसशी झालेल्या संभाषणात तिने स्क्रिप्ट निवडताना तिच्या मनात काय विचार येतात ते सांगितलं.

अभिनेत्री म्हणाली की, तिला अशा भूमिका करायच्या आहेत ज्या प्रभावशाली असतील. तिला टाईपकास्ट व्हायचं नाही असंही तिने सांगितलं. असं घडण्याआधीच ती गोष्टी बदलते.

रिद्धीला विचारण्यात आलं की, तिला हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका करायची आहे का? त्यावर ती म्हणाली, "खरं सांगायचं तर त्या प्रभावी भूमिका नसतील तर नाही."

"मी शॉर्ट स्कर्टमध्ये डान्स करू शकत नाही आणि मला माझ्या शरीराचे काही भाग माझ्या कपड्यांमधून दिसावेत अशी इच्छा नाही. मला कोणत्याही प्रकारे ऑब्जेक्टीफाय व्हायचं नाही."

ती पुढे म्हणाली की, आपल्या अभिनय प्रवासात अनेक सुंदर भूमिका केल्या आहेत. अशा परिस्थितीत कमकुवत स्त्रीची भूमिका करू शकत नाही. मी असं काही करणार नाही.

रिद्धी डोगरा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटात शेवटची दिसली होती. लवकरच ती फवाद खान स्टारर 'अबीर गुलाल' या चित्रपटात दिसणार आहे.

रिद्धी डोगराचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.