Rhea Chakraborty : "जेलमधील १ दिवस एका वर्षासारखा वाटायचा, ३ वर्षे..."; सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने झेलला अपमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:53 IST2024-09-01T16:23:35+5:302024-09-01T16:53:25+5:30
Rhea Chakraborty : रिया आता जेलमधून बाहेर आली असून ती या सर्व परिस्थितीचा सामना करत आहे.

२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या घरात आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अभिनेती रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या मृत्यूचा आरोप होता.
रियाला यासाठी जेलमध्ये जावं लागलं. आजही सुशांतचे चाहते रियालाच दोषी मानतात आणि तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करतात. पण रिया आता जेलमधून बाहेर आली असून ती या सर्व परिस्थितीचा सामना करत आहे.
ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी झालेल्या संवादात रियाने आता आपली व्यथा मांडली आहे. रिया म्हणाली - "मला कधीच वाटलं नव्हतं की संपूर्ण देशाचं माझ्याबद्दल एकसारखंच मत असेल. चांगलं-वाईट विसरून जा."
"एक अभिनेत्री म्हणूनही माझा नंबर १ व्हायचा कधीच हेतू नव्हता. मी अभिनय करताना त्याचा आनंद घेऊ लागले होते. कोणतंही ध्येय नव्हतं."
"माझ्यासोबत जे घडले त्यासाठी मला कोणीही तयार केलं नव्हतं. लोक मला चुडेल, काळी जादू करणारी, नागिण असं म्हणतात. मला आता फरक पडत नाही. होय पण पूर्वी मला दुःख व्हायचं."
"जे घडलं ते मी माफ करू शकेन असं वाटलं नव्हतं. पण ते सोपं झाले कारण मी बराच वेळ खूप रागावले होते. रागामुळे मला एसिडिटीचा त्रास झाला होता."
"मी तीन वर्षांपासून एसिडिटीच्या समस्येने त्रस्त होते. त्यामुळे माफ करणं हा शेवटचा पर्याय ठरला. मला जवळजवळ माफ करण्यास भाग पाडलं गेलं."
रियाला जेलमध्ये घालवलेले दिवस आठवले. जेलमधून बाहेर आल्यानंतर ती तीच व्यक्ती राहणार नाही हे तिला माहीत होतं, असं अभिनेत्रीने सांगितलं.
अभिनेत्रीने सांगितलं की, जेलमधील लोक त्यांच्या नावाने नव्हे तर त्यांच्या नंबरवरून ओळखले जातात. जेलमधील एक दिवस एका वर्षासारखा वाटायचा असंही रियाने म्हटलं आहे.