रश्मिका मंदनासाठी वेडा झाला हा जबरा फॅन, एक झलक पाहण्यासाठी चाहत्याने 900 किमीचं अंतर केले पार पण......
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:14 IST2021-06-24T15:06:51+5:302021-06-24T15:14:44+5:30
सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी फॅन्स काहीही करतात. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना आज प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.

रश्मिका सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट असते.
पण तरीही तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची गर्दी ही होतेच.
रश्मिकाचे कित्येक फॅन्स आहेत.केवळ भारतातच नाही तर जगभरात तिचे फॅन्स पसरलेत.
तिच्या प्रत्येक फॅन्सची काही ना काही खास बात असते.
तेलंगणामध्ये राहणारा आकाश त्रिपाठी हा तरुण रश्मिकाचा रश्मिकाचा जबरा फॅन आहे.
तिला भेटण्यासाठी आकाशने तेलंगणामधून 900 किमीचं अंतर पार करत कर्नाटक गाठलं.
अखेर तिच्या घरापर्यंत तो पोहोचला. पण आकाशवर संशय येताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विचारपुस केल्यानंतर पोलिसांना आकाशने इतका खटाटोप करण्याचे कारण सांगितले.
इतकेच काय तर रश्मिका सध्या शूटिंगसाठी मुंबईत असल्याचे त्याला सांगण्यात आले.
पोलिसांनी आकाशला परत त्याच्या घरी जाण्यास सांगितले.