प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाय अडकला लग्नबंधनात, कोण आहे पत्नी, पाहा PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:52 IST2025-01-24T12:31:10+5:302025-01-24T12:52:32+5:30
प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायनं आयुष्याची नवी इनिंग सुरू केली.

सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. प्रसिद्ध अभिनेता दर्शन रावलनंतर आता प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाय (Emiway Bantai) लग्नबंधनात अडकला आहे.
त्याने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांना चकीत केले आहे. हे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
पत्नीचे नाव स्वालिना (Swaalina) असं आहे. एमीवे बंटायची पत्नी एक अभिनेत्री, व्यावसायिक मॉडेल आणि लोकप्रिय संगीत कलाकार आहे.
स्वालिनाने अनेक म्युझिक व्हिडीओ केले आहेत. दोघांनी २०२३ मध्ये आलेल्या 'कुडी' या सुपरहिट गाण्यात एकत्र काम केले होते.
यावेळी चाहत्यांना एमीवे बंटाई आणि स्वालिना यांच्यातील केमिस्ट्री खूप आवडली होती. आता, दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.
एमीवे बंटाई आणि स्वालिना खूपच सुंदर दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद पाहायला मिळतोय.
या नव्या जोडप्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फोटोंवर लाखो लाईक्सही आले आहेत.