जन्म होताच अभिनेत्रीची हॉस्पिटलमध्ये झालेली अदला बदली! डोळ्यांमुळे पटली ओळख, नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:11 IST2025-03-21T14:22:30+5:302025-03-21T15:11:10+5:30
एका अभिनेत्रीची जन्मानंतर हॉस्पिटलमध्येच अदलाबदली झाली होती. कोण होती ही अभिनेत्री चला जाणून घेऊया.

आपल्या लाडक्या आणि आवडत्या सेलिब्रिटीबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सेलिब्रिटींचे लहानपणीचे किस्से ऐकायलाही चाहत्यांना मजा वाटते.
एका अभिनेत्रीची जन्मानंतर हॉस्पिटलमध्येच अदलाबदली झाली होती. कोण होती ही अभिनेत्री चला जाणून घेऊया.
ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची एकेकाळची टॉपची हिरोईन राणी मुखर्जी. जन्म होताच राणी मुखर्जीची हॉस्पिटलमध्ये बदली झाली होती.
पण, आईच्या सतर्कतेमुळे राणी मुखर्जी पुन्हा तिच्या कुटुंबाकडे गेली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
अभिनेत्रीच्या डोळ्यांमुळे ही राणी मुखर्जी नसल्याचं तिची आई कृष्णा मुखर्जी यांनी ओळखलं. अभिनेत्रीनेच हा किस्सा मुलाखतीत सांगितला होता.
राणी मुखर्जीचे डोळे ब्राऊन रंगाचे होते. त्यामुळे दुसरं बाळ हातात येताच हे बाळ आपलं नसल्याचं राणी मुखर्जीच्या आईने ओळखलं.
"ही माझी मुलगी नाही. माझ्या मुलीचे डोळे ब्राऊन आहेत. माझ्या मुलीला शोधून आणा", असं म्हणत कृष्णा मुखर्जींनी हॉस्पिटलच डोक्यावर घेतलं.
त्यानंतर मग शोधाशोध सुरू झाली आणि राणी मुखर्जी एका पंजाबी कुटुंबाकडे सापडली.
बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेल्या राणी मुखर्जीचा आज वाढदिवस आहे.