रणदीप हुड्डा होणार बाबा! पत्नी लिन लैशरामचं ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंपही केला फ्लॉन्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:52 IST2026-03-09T14:32:09+5:302026-03-09T14:52:31+5:30

रणदीप आणि लिनच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरु होतोय.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि त्याची पत्नी लिन लैशराम (Lin Laishram) यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

नुकतंच रणदीप आणि लिन या जोडीने अतिशय सुंदर आणि आकर्षक 'मॅटर्निटी फोटोशूट' केलं आहे.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये लिनचा अतिशय स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

लिनने या फोटोंमध्ये आपला 'बेबी बंप' अतिशय आत्मविश्वासाने फ्लॉन्ट केला आहे.

या खास फोटोशूटसाठी लिनने संपूर्ण पांढऱ्या रंगाचा (ऑल व्हाई) स्टायलिश आउटफिट परिधान केला आहे. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रणदीप आणि लिन यांच्यात १० वर्षांचे वय अंतर आहे. अनेकांना ठाऊक नसेल, परंतु रणदीप हुड्डा सध्या ४९ वर्षांचा आहे. त्याची पत्नी लिन लाशराम ३९ वर्षाची आहे.

रणदीप आणि लिनने २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरच्या इम्फाळमध्ये मेतेई परंपरेनुसार सुंदर समारंभात लग्न केलं होतं. या समारंभाला दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.

रणदीप आणि लिनची पहिली भेट नसीरुद्दीन शाह यांच्या मोटली या थिएटर ग्रुपमध्ये झाली. सुरुवातीला साधी ओळख असलेले दोघे हळूहळू एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात प्रेम बहरलं.

लॉकडाउनच्या काळात दोघांनी एकत्र वेळ घालवला. त्यानंतर रणदीप आणि लिनने २०२२ मध्ये इंस्टाग्रामवर आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं होतं.

लग्नानंतर लिनला या प्रेग्नेंसीपूर्वी एकदा मिसकॅरेजचा (गर्भपात) सामना करावा लागला होता. जो काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता. त्यानंतर आता हे बाळ त्यांच्या आयुष्यात नवी किरण घेऊन आले आहे.

आता रणदीप आणि लिनच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरु होतोय. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी ते दोघेही उत्सुक आहेत.