रणदीप हुड्डा झाला बाबा, वडिलांच्या वाढदिवशीच बाळाचा जन्म झाल्याने अभिनेत्याची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:34 IST2026-03-10T17:20:13+5:302026-03-10T17:34:34+5:30

रणदीप हुड्डानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन गूड न्यूज दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि त्याची पत्नी लिन लैशराम (Lin Laishram) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जोडप्यानं आपल्या बाळाचं स्वागत केलंय.

लिन लैशराम आई झाली आहे. वयाच्या ४०व्या वर्षी लिन लैशरामनं मुलीला (Randeep Hooda Lin Laishram Blessed With Baby Girl) जन्म दिला आहे.

रणदीप हुड्डानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन गूड न्यूज दिली आहे. रणदीपने चाहत्यांना आपल्या लाडक्या लेकीची पहिली झलक दाखवली आहे.

विशेष म्हणजे रणदीपसाठी हा आनंद दुहेरी ठरला आहे, कारण आज १० मार्च २०२६ त्याच्या मुलीचा जन्म झाला आणि आजच त्याच्या वडिलांचा वाढदिवस असतो.

रणदीपने पोस्टमध्ये आनंदाने लिहिले की, "आजोबा आणि नातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"

बाबा झाल्याचा आनंद व्यक्त करताना रणदीप कमालीचा भावुक झाला. त्याने आपल्या पोस्टमध्ये वडिलांप्रती आदर व्यक्त करताना पत्नीचेही आभार मानले.

रणदीप म्हणाला, "आज मी बाबा झालो आहे आणि त्यामुळे बाबांबद्दलचा माझा आदर आणखी वाढला आहे. लिन, मला बाबा बनवल्याबद्दल आणि आपल्या छोट्या मुलीला या जगात आणल्याबद्दल तुझे मनापासून आभार".

रणदीपने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लिन हिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पारंपरिक थाटात पार पडला. ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न केलं होतं. आता त्यांच्या आयुष्यात आलेल्या या नव्या आनंदामुळे दोघेही प्रचंड आनंदी झाले आहेत.