राणा दग्गुबातीच्या लग्नाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का? आठवडाभरानंतर आलेत समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 13:02 IST2020-08-17T12:47:50+5:302020-08-17T13:02:15+5:30
राणाची वाईफ मिहिका बजाजने शेअर केलेत Unseen Photos

बाहुबली या लोकप्रिय चित्रपटामधील भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज यांच्या लग्नाला आता आठवडा झाला. मात्र या लग्नाचे फोटो अद्यापही सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत.
नुकतेच मिहिकाने तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
गत 8 ऑगस्टला राणा व मिहिकाचा शाही विवाह पार पडला होता.
हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत हे शाही लग्नसोहळा पार पडला होता.
राणा या फोटोत मिहिकाला मंगळसूत्र घालताना दिसतोय. यावेळी मिहिका मनातल्या मनात हसताना दिसतेय.
लग्नाच्या आणाभाका घेतानाचा हा फोटो अतिशय सुंदर आहे.
राणा व मिहिका बजाज या दोघांच्याही चेह-यावर आनंद बघण्यासारखा होता.
लग्नात मिहिका अतिशय सुंदर दिसत होती. राणाही राजबिंडा दिसत होता.
राणा व मिहिकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रत्येक फोटोत दिसतेय.
मिहिका व राणाच्या या फोटोने चाहत्यांना वेड लावले आहे.
कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पण त्याचा थाट बघण्यासारखा होता.
मिहिकाने धम्माल मस्ती केली.
मिहिका इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे.
मिहिकाचे वडिल हैदराबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत.
आई ज्वेलरी डिझायनर आहे.