Rakhi Gifts: महागड्या गाड्यां ते आलिशान बंगले, सेलिब्रिटींनी बहिणींना दिले राखीचे खास गिफ्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 06:15 PM2022-08-12T18:15:32+5:302022-08-12T18:21:06+5:30

राखीचा सण सर्वांसाठी खास असतो, बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील या दिवशी त्यांच्या बहिणींवर असलेले प्रेम व्यक्त करतात.

रक्षाबंधनाचा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लहान असो वा मोठे, प्रत्येकजण आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी उत्सुक असतो. बॉलीवूड सेलिब्रिटीही आपल्या बहिणींसोबत हा खास क्षण मोठ्या उत्साहात साजरा करतात. विशेष म्हणझे, सेलिब्रिडी त्यांच्या बहिणींना महागड्या भेटवस्तू (Bollywood Rakhi Gift) देतात. जाणून घेऊ स्टार्स त्यांच्या बहिणींना नेमकं काय देतात...

सलमान खान (Salman Khan) त्याच्या बहिणी अलविरा आणि अर्पिताला खूप मानतो. दरवर्षी तो बहिणींसोबत राखीचा सण मोठ्या आनंदात साजरा करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानने त्याच्या दोन्ही बहिणींना एक-एक फ्लॅट भेट म्हणून दिला आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि त्याची बहीण कृतिका यांची बॉन्डिंगही खूप गोड आहे. हे दोघेही एका चांगल्या भावंडाचे उत्तम उदाहरण आहेत. रिपोर्ट्सनुसार, एकदा कार्तिकने आपल्या बहिणीला राखीची भेट म्हणून 70 लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी दिली होती.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर परदेशात राहायला गेली, पण तिची भारतीय संस्कृतीशी नाळ तुटलेली नाही. ती सर्वभारतीय सण उत्साहात साजरी करते. दरम्यान, प्रियंका भाऊ सिद्धार्थ व्यतिरिक्त 20 चुलत भावांनाही राखी बांधते. रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थने राखीची भेट म्हणून प्रियंकाला 10 कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला होता.

राखीला महागडी भेट देण्याच्या यादीत लव आणि कुश सिन्हा यांचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) भावंडांनी तिला एक हार गिफ्ट केला होता, ज्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये होती.

जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतही चांगले नाते आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अर्जुनने जान्हवीला सुमारे 1 कोटी रुपयांचा डायमंड सेट गिफ्ट केला होता.

रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी राखीच्या निमित्ताने सुपरस्टार हृतिक रोशनने (Hrithik Roshan) त्याची बहीण सुनैनाला एक हँड बॅग भेट दिली होती. या हँड बॅगची किंमत किंमत सुमारे 4 लाख रुपये होती.