राजपाल यादवच्या छोट्या लेकीला पाहिलंत का? दिसते इतकी क्यूट की भलेभले स्टारकिड होतील फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:59 IST2026-02-25T15:50:13+5:302026-02-25T15:59:56+5:30

राजपालची छोटी मुलगी रेहांशी म्हणजे रेहू सध्या चर्चेत आली आहे. रेहूने तिच्या क्यूटनेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव त्याच्या ९ कोटी चेक बाऊन्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. आज त्याच्या फॅमिलीबद्दल जाणून घेऊया.

राजपाल यादवचं छोटंसं कुटुंब आहे. यामध्ये तो, त्याची पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.

राजपालची छोटी मुलगी रेहांशी म्हणजे रेहू सध्या चर्चेत आली आहे. रेहूने तिच्या क्यूटनेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रेहांशीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील राजपाल यादवसोबतच्या फोटोंमध्ये बापलेकीचा बाँड पाहायला मिळत आहे.

राजपाल यादव अनेकदा त्याचा कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

रेहांशी ही राजपाल यादवची सगळ्यात छोटी मुलगी आहे. तिचा जन्म २०१८ मध्ये झाला. सगळे तिला लाडाने रेहू बोलतात.

आता रेहांशी ८ वर्षांची झाली आहे. रेहांशीचा क्यूटनेस चाहत्यांना भलताच आवडला आहे. तिच्यापुढे राहा आणि तैमुरही फेल असल्याचं चाहते म्हणत आहेत.

रेहांशी ही राजपाल यादवच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. पहिल्या मुलीला जन्म दिल्यानंतर राजपालच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं.