Gandhi-Godse Ek Yudh: राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी-गोडसे एक युद्ध' चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 06:46 PM2022-12-27T18:46:12+5:302022-12-27T18:46:12+5:30

राजकुमार संतोषी यांच्या ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ या पिरियड चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील विचारधारेचे युद्ध दाखवण्यात आले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दीपक अंतानी या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका साकारत आहेत, तर चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी या चित्रपटाद्वारे नऊ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

गांधी-गोडसे एक युद्ध हा सिनेमा २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

चित्रपटात ए आर रहमान (A R Rehman) यांनी म्युझिक दिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

2013 मध्ये आलेला शाहिद कपूरचा फाटा पोस्टर निखला हिरो हा राजकुमार संतोषीचा शेवटचा चित्रपट होता. (फोटो: इंस्टाग्राम)