जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:14 IST2024-11-07T12:10:30+5:302024-11-07T12:14:50+5:30
आलिया-रणबीरच्या राहाचा दुसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत.

कपूर घराण्याची लाडकी असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भटची लेक राहा नुकतीच दोन वर्षांची झाली.
आलिया-रणबीरच्या राहाचा दुसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत.
राहाच्या वाढदिवसाला जंगल थीम करण्यात आली होती. राहाच्या दुसऱ्या वाढदिवसाचा केकही खास होता.
राहाच्या वाढदिवसाला कुटुंबीयांबरोबर सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.
नातीच्या वाढदिवासाला महेश भटही हजर होते. राहाच्या बर्थडे पार्टीतील महेश भट यांचा खास फोटो.
९०चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींनी राहाच्या बर्थडेला चार चांद लावले. नीना गुप्तांनी हा फोटो शेअर केला आहे.
राहाच्या बर्थडे पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी राहाला जन्म दिला होता. आता राहा २ वर्षांची झाली आहे.