टेलिव्हिजन क्वीनच्या भावाला डेट करत होती राधिका आपटे, अद्याप अभिनेता आहे सिंगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:22 IST2025-07-23T19:16:56+5:302025-07-23T19:22:13+5:30
Radhika Apte : राधिका आपटे ही बॉलिवूडमधील व्हर्सेटाइल अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत.

राधिका आपटे ही बॉलिवूडमधील व्हर्सेटाइल अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत.
राधिकाने तिच्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली आणि 'वाह! लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
२००९ मध्ये, राधिकाला बंगाली चित्रपट 'अंतहीन'मध्ये पहिली मुख्य भूमिका मिळाली. तेव्हापासून, राधिकाने कधीही मागे वळून पाहिले नाही.
एकेकाळी राधिका टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरचा भाऊ आणि अभिनेता तुषार कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती, असे सांगितले जाते. एवढंच नाही तर एकताने एका शोमध्ये राधिकावर निशाणादेखील साधला होता.
'शोर इन द सिटी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, राधिकाला तुषार कपूरसोबत कास्ट करण्यात आले होते. त्यावेळी अशी चर्चा पसरली होती की ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत.
चित्रपटाच्या कथेव्यतिरिक्त, चित्रपटातील राधिका आणि तुषारची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. असेही बोलले जात होते की राधिका आणि तुषार एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत.
तुषार आणि राधिका डेटिंगच्या अफवा जोर धरू लागल्या तेव्हा, एकता कपूरने राधिकाबद्दल वादग्रस्त विधान करून या अफवा खऱ्या ठरवल्या. कॉफी विथ करणमध्ये तिचा भाऊ तुषार कपूरसोबत दिसलेली एकता राधिकावर टीका करत होती आणि तुषारच्या महिलांच्या निवडीबद्दल विनोद करत होती.
रॅपिड फायर राउंड दरम्यान, करणने तुषारला टॉप पाच सेक्सी अभिनेत्रींना रेटिंग देण्यास सांगितले. त्यावर, तुषार करीना, प्रियांका आणि कतरिनाचे नाव घेतो आणि नंतर विचार करायला थांबतो. मग एकता त्याला थांबवते आणि म्हणते, "राधिका आपटे".
यावर करण जोहर विचारतो, ही राधिका कोण आहे?’ एकता देखील टोमणे मारते आणि म्हणते, ‘अगदी! कोण आहे?’ एकता गमतीने म्हणते की तुषारची महिलांच्या बाबतीत बॅड टेस्ट आहे.
राधिकाला ओटीटी क्वीन म्हणूनही ओळखले जाते कारण तिचे बहुतेक चित्रपट तिथे प्रदर्शित झाले आहेत.
राधिकाने शोर इन द सिटी, बदलापूर, मांझी - द माउंटन मॅन, पार्च्ड, पॅड मॅन, मॅडली, लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स, अंधाधुन आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.