प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या रिसेप्शनला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 15:24 IST2018-12-21T13:37:20+5:302018-12-21T15:24:54+5:30

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या सेलिब्रिटी कपलचे तिसरे रिसेप्शन काल रात्री मुंबईत पार पडले.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास प्रत्येक गेस्टच्या स्वागतासाठी स्वतः उभे होते.
आदिती राव हैदरी आणि नील नितीन मुकेश डॅशिंग अंदाजात दिसले
राजकुमार राव आणि करण जोहर देखील या रिसेप्शनला आवर्जून उपस्थित होते.
तनिषा मुखर्जी तसेच गोविंदाने संपूर्ण कुटुंबियांसोबत हजेरी लावली
पूनम ढिल्लोन काळ्या रंगाच्या साडीत खूपच छान दिसत होती.
डिनो मोरियाला देखील प्रियांकाच्या रिसेप्शनला आवर्जून आला होता
कार्तिक आर्यन, डायना पेंटी खूपच छान दिसत होते.
शबाना आझमी ट्रेडिशनल साडीत खूपच छान दिसत होती तर आयशा टाकिया तिच्या पतीसोबत आली होती.
शत्रुघ्न सिन्हाची पत्नी मुलासोबत तर सुभाष घई पत्नीसोबत उपस्थित होते.
प्रियांका चोप्राच्या फॅशन चित्रपटाचा दिग्दर्शक मधुर भांडारकर देखील प्रियांकाला शुभेच्छा द्यायला आला होता.
जितेंद्र आणि त्यांचा मुलगा तुषार तसेच गायिका आशा भोसले, काजोल या सोहळ्याला उपस्थित होत्या.
प्रियांकाची चुलत बहीण परिणिती चोप्रा लहेंगामध्ये खूपच छान दिसत होती. दिया मिर्झा देखील पतीसोबत रिसेप्शनला पोहोचली.
यामी गौतम, स्वरा भास्कर देखील खूपच छान दिसत होत्या.
कबीर खान त्याची पत्नी मिनी माथुर सोबत दिसले तर प्रियांकाचा पूर्वप्रियकर हरमन बावेजाने देखील प्रियांकाला शुभेच्छा दिल्या.
रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, नवाझुद्दीन सिद्दीकी कुल अंदाजात दिसले.
जान्हवी कपूर, इशान खट्टर, सारा अली खान ही नवीन पिढी देखील आवर्जून उपस्थित होती.
संजय लीला भन्साळी तसेच शाहिद कपूर त्याच्या पत्नीसोबत हजर होता.
अनुष्का शर्मा साडीत खूपच छान दिसत होती तसेच आयुष शर्मा देखील कुल अंदाजात दिसला.
सोनाली कुलकर्णी कुटुंबियांसमवेत तर साइना नेहवाल पतीसोबत उपस्थित होते.
बॉबी देओल देखील या रिसेप्शनला हजर होता.
कॅटरिना कैफ आणि सलमान खान देखील या रिसेप्शनला आवर्जून उपस्थित होते.
सिमी गरवाल पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच छान दिसत होत्या. तसेच हिमेश रेशमिया देखील उपस्थित होता.
अभिनता आशिष चौधरी तसेच सानिया मिर्झा देखील कुल अंदाजात दिसले.
जावेद जाफ्रीदेखील त्याच्या मुलीसोबत उपस्थित होता.
अनिल कपूर पुतणी अंशुलासोबत उपस्थित होता तर अनुपम खेर आणि सतिश कौशिक हे दोघे या रिसेप्शनच्या निमित्ताने कित्येक दिवसांनी भेटले
ए. आर रहमानदेखील प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी आला होता.
विवेक ऑबेरॉय त्याच्या पत्नीसोबत रिसेप्शनमध्ये दिसला.
रणधीर कपूर, हेमा मालिनी यांनी देखील प्रियांका, निकला आशीर्वाद दिले.
उर्मिला मातोंडकर काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये मस्त दिसत होती.
राज बब्बर पत्नी नादिरा, मुलगी जुही आणि जावई अनुप सोनीसोबत प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.