पूजा हेगडेचा सुंदर लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:04 IST2024-10-28T15:46:26+5:302024-10-28T16:04:01+5:30
पूजा हेगडेने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडसह दक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे हे नाव सिनेरसिकांसाठी नवं नाही.
हिंदी, तमिळ तसेच तेलुगु पाठोपाठ अनेक सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
अशातच पूजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने खास फोटोशूट केलं आहे.
पूजा हेगडेने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.
पूजाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला असून त्यावर सुंदर कानातले परिधान केले आहेत. या पारंपरिक लूकमध्ये पूजा सुंदर दिसत आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिची अदा पाहून तर चाहते घायाळ झाले आहेत.
पूजा हेगडेने 2016 साली 'मोहेंजोदरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
आतापर्यंत पूजाने सलमान, हृतिक आणि रणबीर यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली.
पूजा हेगडे लवकरच शाहिद कपूरसोबत 'देवा' या ॲक्शन ड्रामा चित्रपटात झळकणार आहे.
'देवा' हा या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्स यांनी केली आहे.