एकेकाळी कपडे विकत घेण्यासाठीदेखील कंगनाकडे नव्हते पैसे, फक्त 1500 रुपये घेऊन आली होती मुंबईत, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 15:31 IST2020-09-10T15:19:52+5:302020-09-10T15:31:08+5:30

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आज कोटींची मालकीण आहे आणि ती लक्झरी लाइफ जगते आहे. पण एक वेळ असा होता की कंगनाकडे कपडे विकत घेण्यासाठीदेखील पैसे नव्हते. जे परिधान करून ती इव्हेंटमध्ये सहभागी होईल.

एकदा एका इव्हेंटमध्ये कंगनाने ज्वेलरीच्या जागी गळ्यामध्ये रिबन बांधली होती. कंगना मुंबईत फक्त 1500 रुपये घेऊन आली होती. कंगना राणौतने सांगितले होते की, तिच्या कठीण काळात एका मित्राने तिची खूप मदत केली होती ज्यामुळे ती अवॉर्ड सोहळ्यांमध्ये सामील होऊ शकली होती.

2009 साली एका इव्हेंटमध्ये जेव्हा कंगना पोहचली तेव्हा तिचा लूक पाहून सगळे हैराण झाले होते. यावेळी कंगनाने लेमन यलो रंगाचा स्पगेटी स्ट्रैप्स ड्रेस घातला होता. ज्याला प्लंजिंग नेकलाइन होती. या शॉर्ट ड्रेससोबत त्याच रंगाचा आणि नेकलाइन डिझाइनची ब्रा मॅच केली होती.

या ड्रेसवर नॅचरल कुरळे केस वन साइड पिना लावल्या होत्या आणि सोबतच गुलाब लावले होते. एकीकडे सेलिब्रेटी ड्रेस आणखीन स्पेशल बनवण्यासाठी ज्वेलरी व अॅक्सेसरिजचा वापर करतात. तसे कंगनाने यलो ड्रेसवर गळ्यात सॅटीन यलो रिबिन गुंडाळली होती.

यासोबतच कंगनाने रेड कलर हिल्स आणि हातात त्याच रंगाचा क्लच घेतला होता.

तिची ही स्टाइल खूप चर्चेत आली होती.

आता कंगनाची कोटींची मालकीण असून मीडिया रिपोर्टनुसार कंगना राणौत एका चित्रपटासाठी 11 कोटी रूपये मोजून घेते. याशिवाय अनेक जाहिरातीतही काम करते. तसेच एका दिवसाच्या प्रचारासाठी तिची फी दीड कोटी रूपये आहे.

















