New Year 2023 : २०२३ मध्ये हे चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कोणते आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 07:31 PM2022-12-27T19:31:29+5:302022-12-27T19:35:29+5:30

२०२३ मध्ये हे बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट 'टायगर 3' पुढील वर्षी २१ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

अजय देवगणचा आणखी एक चित्रपट 'मैदान' १७ फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'भोला' हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून, तब्बू, संजय मिश्रा आणि मकरंद देशपांडे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे.

साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन यांचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे.