मि.परफेक्शनिस्ट झाला ५२ वर्षांचा...हॅप्पी बर्थडे टु यू....!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-14T11:45:17+5:302018-06-27T20:23:42+5:30

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार आमिर खान ५२ वर्षांचा झाला. वांद्रे येथील त्याच्या घरी त्याने केक कापून सेलिब्रेशन केले. चाहते, हितचिंतक, फोटोग्राफर्स यांनी त्याच्या या छोट्याशा पार्टीला गर्दी केली होती. वाढदिवसाप्रसंगी आमिर खान अत्यंत खुश दिसत होता. तसेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी वजन घटवल्याचेही प्रकर्षाने लक्षात आले.