कुडकुडत्या थंडीत मौनी रॉय स्विमिंग पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 11:35 IST2021-02-02T11:35:55+5:302021-02-02T11:35:55+5:30

नुकतेच मौनी रॉयने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातील ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
या फोटोत मौनी रॉय स्विमिंग पूलमध्ये आराम करताना दिसते आहे.
मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती.
मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचारमध्ये कोर्स केला आहे. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले.
मौनी रॉय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नागिन शिवन्या आणि देवों के देव महादेवमधील सतीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.
मौनी रॉयने करिअरची सुरूवात २००७ साली मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीमधून केली होती.
मौनीचे इंस्टाग्रामवर १५.८ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.