तुफान व्हायरल होत आहेत बंगाली बाला मौनी रॉयचे हे फोटो; तुम्हीही म्हणाल, खूब भालो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 16:16 IST2020-05-19T16:16:26+5:302020-05-19T16:16:26+5:30

नागीन मालिकेतून अभिनेत्री मौनी रॉय हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील नागीन अवताराला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. सोशल मीडियावरही मौनीचे असंख्य चाहते आहेत.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत.
या फोटोत मौनी तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.
लॉकडाऊनच्या काळात मौनी फिटनेसबद्दल किती जागृत आहे, हेच तिच्या या फोटोंवरून दिसतेय.
सध्या तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय.
तिच्या या फोटोंना सुमारे 5 लाच 65 हजारांवर लाइक्स मिळाले आहेत.
२००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने 'गोल्ड' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
लवकरच ती रणबीर व आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार आहे.