कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या मुलीला मिथुन चक्रवर्तींनी घेतलेलं दत्तक, आता दिसते प्रचंड सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:42 IST2026-02-12T18:32:52+5:302026-02-12T18:42:09+5:30
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली, मिथुन चक्रवर्तींनी घेतलं पालकत्व, ती आज जगतेय आनंदी आयुष्य

बॉलिवूडचे 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. पण, या अभिनेत्याने केवळ अभिनयानेच नाही तर त्याच्या कृतीनेही अनेकदा चाहत्यांची मनं जिंकली.

एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अवस्थेत सापडलेल्या नवजात मुलीला दत्तक घेऊन मिथुन यांनी तिला केवळ नावच दिले नाही, तर एका राजकुमारीसारखे आयुष्य दिले.

ही घटना ९० च्या दशकातील आहे. कोलकातामध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका नवजात बाळाचा रडण्याचा आवाज काही लोकांना आला. यावेळी एका दयाळू माणसाने त्या बाळाला वाचवलं आणि घरी नेले.

ही बातमी मिथून यांनी वर्तमानपत्रात वाचली, तेव्हा त्यांनी त्या बाळाला दत्तक घेण्याचं ठरवलं आणि कोलकाता गाठलं. त्यांची पत्नीसुद्धा या निर्णयामध्ये त्यांच्या सोबत होती. दोघांनी मिळून तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला.

मिथुन आणि पत्नी योगिता बाली यांनी या मुलीला अत्यंत प्रेमाने सांभाळले असून, तिचे नाव दिशानी चक्रवर्ती असे ठेवले.

भारतात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, दिशा पुढील शिक्षणासाठी लॉस एंजेलिसला गेली. पुढे ती न्यू यॉर्क अकादमीमधून पदवीधर झाली.

दिशानीनं मिथून यांच्या पावलावर पाऊल ठेवतं २०१७ मध्ये, 'गिफ्ट' या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

दिशानी त्यानंतर 'अंडरपास', 'होली स्मोक', 'टू फेस्ड' आणि 'व्हाय डिड यू डू इट' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची 'द गेस्ट' या लघुपटात दिसली होती.

दिशानी मोठी झाली असून ती प्रचंड सुंदर दिसते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तिचे इंस्टाग्रामवर ९६,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

दिशानी सध्या माइल्स मँटझारिस याला डेट करत आहे. दिशानी वारंवार तिच्या परदेशी बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करते.

















