हा केवळ योगायोग की... शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा चर्चेत, १९ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:43 IST2025-05-06T18:20:08+5:302025-05-06T18:43:50+5:30

शाहरुख-प्रियंकाचा मेट गाला लुक पाहून नेटकऱ्यांना आठवली 'डॉन'ची जोडी

सध्या जगप्रसिद्ध फॅशन इव्हेंट 'मेट गाला'ची (Met Gala 2025 ) सर्वत्र चर्चा सुरू आहे. न्यूयॉर्कमध्ये आयोजित 'मेट गाला २०२५' सोहळ्यात जगभरातील अनेक तारे तारकांनी हजेरी लावली.

भारतातून शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ, मनीष मल्होत्रा, ईशा अंबानी आणि प्रियंका चोप्रा हे सेलिब्रिटी पोहोचले. प्रत्येकाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पण, या सर्वांमध्ये शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा या दोघांची (Shah Rukh Khan And Priyanka Chopra At Met Gala 2025) चर्चा जास्त होत आहे. याला कारण ठरला आहे, दोघांनी 'मेट गाला'साठी केलेला लूक.

यावेळी शाहरुख हा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेल्या लाँग लेंग्थ फ्लोअर कोटमध्ये दिसला. यासोबत गळ्यात K चं लॉकेट, गोल्डन ज्वेलरी, काळा गॉगल आणि हातात काळी छडी अशा लूकमध्ये शाहरुख खानने मेट गालाच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. या लूकमध्ये तो डॅशिंग आणि एकदम स्टायलिश (Shah Rukh Khan In Met Gala 2025) दिसत होता.

तर प्रियंका ही पोलका ड्रेसमध्ये (Priyanka Chopra In Met Gala 2025) दिसली. हा लूक मेट गाला २०२५ च्या थीम "सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाईल" आणि ड्रेस कोड "टेलर्ड फॉर यू" शी अगदी जुळत होता. तिने हा लूक एका मोठ्या काळ्या टोपीने आणि बुल्गारीच्या एका आकर्षक दागिन्यांच्या सेटने पूर्ण केला.

प्रियंका आणि शाहरुखच्या लूकमध्ये एक वेगळंच साम्य चाहत्यांना आढळलं आहे. शाहरुख आणि प्रियंकाचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉन’ या सुपरहिट चित्रपटाची आठवण झाली.

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राकडून नकळतपणे १९ वर्षांपूर्वीचा 'तो' लूक यंदाच्या ‘मेट गाला’मध्ये रिक्रिएट झाला आहे.

सध्या शाहरुख-प्रियंकाचे १९ वर्षांपूर्वीचा ( Don And Roma Look 19 Years Old Photos Viral) फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. २००६ मध्ये ‘डॉन’ सिनेमाचं प्रमोशन करताना हे फोटो काढण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा शाहरुखने काळ्या रंगाचा सूट तर, प्रियांकाने पोलका डॉट ड्रेस घातला होता.

बॉलिवूडचा 'किंग खान' पहिल्यांदा 'मेट गाला' सहभागी झाला होता. पण, प्रियंका चोप्रा हिची 'मेट गाला'मध्ये उपस्थित राहण्याची ही पाचवी वेळ होती.

प्रियंका तिचा पती निक जोनाससह या कार्यक्रमात पोहोचली होती. निकने प्रियांकाच्या लूकशी जुळणारा पांढरा शर्ट आणि काळी पँट देखील घातली होती

यंदाच्या रेड कार्पेटवर शाहरुख-प्रियांका एकमेकांना भेटलेले नाहीत आणि त्यांचे एकत्र कोणतेच फोटो नाहीयेत.