‘इलू इलू गर्ल’ मनिषा कोईरालाचे पूर्वी कधीही न पाहिलेले फोटो, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:06 IST2021-06-01T16:00:31+5:302021-06-01T16:06:45+5:30

अभिनेत्री मनिषा कोईराला सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते.

नुकतेच तिने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मनिषा कोईरालाचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कोणत्याही प्रकारचा मेकअप तिने केलेला नाहीय, विना मेकअपच सगळे फोटो क्लिक केले आहेत.

विनामेकअप असली तरी पूर्वी सारखीच सुंदर ती दिसत असल्याचे चाहते कमेंट्स करत आहेत.

मनिषाने ५० वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.

मनिषादेखील नित्यनियमाने वर्कआऊट करते.

सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट करतानाचे फोटो इतरांनाही प्रेरणा देतात.

मनिषाच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत.

२०१२ दरम्यान मनीषाला कर्करोग झाला. मनीषाने जिद्दीने कॅन्सरवर मात केली.

आता ती पूर्णपणे फिट असून पूर्वीसारखेच तिचे आयुष्य एन्जॉय करत आहे.