PHOTOS : पार्टी तो बनती है! मनिष मल्होत्राच्या बर्थ पार्टीला 'एव्हरग्रीन' टच; रेखा-रवीना-काजोलची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 02:56 PM2022-12-05T14:56:00+5:302022-12-05T15:08:30+5:30

Manish Malhotra Birthday Party : हे फोटो व्हायरल झालेत आणि सदाबहार रेखाचीच चर्चा रंगली. गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये रेखा कमालीच्या सुंदर दिसत आहेत...

बॉलिवूडचा दिग्गज फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याचा आज वाढदिवस. काल रात्री बाराच्या ठोक्याचा मनीष मल्होत्राचा वाढदिवस साजरा झाला.

मनीषने आपल्या आईसोबतचा बर्थ डे स्पेशल फोटो शेअर केला. माझ्या आईचा आशीर्वाद आणि तिची सोबत यापेक्षा दुसरं बर्थ डे सेलिब्रेशन असूच शकत नाही, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं.

रवीना टंडन हिनेही मनीषच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोत रेखा, काजोल, करण जोहर असे सगळे दिसत आहेत.

हे फोटो व्हायरल झालेत आणि सदाबहार रेखाचीच चर्चा रंगली. गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये रेखा कमालीच्या सुंदर दिसत आहेत.

मनीष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीत रवीनाने धम्माल मज्जा केली. रेखाच्या मांडीवर बसून तिने अशी मस्त पोझ दिली.

रवीनाने रेखा यांच्यासोबत एकापेक्षा एक हटके पोझ दिल्यात. चाहतेही या फोटोंच्या प्रेमात पडले.

रवीना रेखा यांचा हा कॅन्डिड फोटो पाहून चाहतेही क्रेझी झालेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या.

रवीनाने मनीष मल्होत्रासोबतचा एक फोटोही शेअर केला. सर्वात दयाळू, उदार व सुंदर मनाचा माणूस.... खूप सारं प्रेम, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.