आताही तितकीच सुंदर दिसते 'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी, आता कुठे आहे गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:00 IST2025-07-29T15:56:38+5:302025-07-29T16:00:21+5:30

Actress Mandakini : अभिनेत्री मंदाकिनीने सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करून खळबळ उडवून दिली होती. तिने 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. तिने चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले.

अभिनेत्री मंदाकिनीने सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करून खळबळ उडवून दिली होती. तिने 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. तिने चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले.

या चित्रपटात मंदाकिनीचा धबधब्याखाली आंघोळ करण्याचा सीन आहे. या सीनवरून बराच गोंधळ उडाला होता. ट्रान्सपरेंट पांढऱ्या रंगाची साडी घालून धबधब्याखाली आंघोळ करताना ती दिसली होती. या दरम्यान तिचा अवतार खूपच बोल्ड होता.

'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट राज कपूर यांनी बनवला होता. तिने चित्रपटात गंगा सिंहची भूमिका साकारली होती. या चित्रपटात राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर देखील होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

या चित्रपटानंतर मंदाकिनी ओम, जीवा, आग और शोला, जाल, अपने अपने, लोहा, प्यार करके देखो, डांस डांस, शूरवीर, जीते हैं शान से, परम धरम, हवालात, मालामाल, नाग नागिन, दुश्मन, प्यार के नाम कुर्बान, प्यार का सौदागर, देशवासी, नाच गोविंदा नाच यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

मंदाकिनी शेवटची १९९६ मध्ये 'जोरदार' चित्रपटात दिसली होती. ती तिच्या पहिल्या चित्रपटातून मिळालेले यश टिकवू शकली नाही.

मंदाकिनीचा जन्म ३० जुलै १९६३ रोजी झाला. तिचे वडील ब्रिटिश होते आणि आई काश्मिरी होती.

१९९० मध्ये मंदाकिनीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले गेले. त्यानंतर तिच्या कारकिर्दीचा आलेख खाली घसरू लागला.

त्यानंतर मंदाकिनीने बौद्ध भिक्षू डॉ. काग्युर टी. रिंपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर मंदाकिनीने चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. तिने तिचे पूर्ण लक्ष कुटुंबावर केंद्रित केले.