कितने अजीब रिश्ते हैं यहां पर ! घटस्फोट घेतल्यानंतरही बॉलिवूडचे हे 7 कपल राहतात एकत्र, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:19 PM2023-01-28T13:19:01+5:302023-01-28T13:32:14+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल्स आहेत जे घटस्फोट घेतल्यानंतरही एकमेकांसोबत दिसतात, एकमेकांना कायम साथ देताना दिसतात, कारण....

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कपल्स आहेत, जी वर्षानुवर्षे एकत्र आहेत. जया बच्चन-अमिताभ बच्चन, शाहिद कपूर-मीरा राजपूत, अजय देवगण-काजोल ही अशी अनेक कपल्स आहेत ज्यांना लोक आपलं आदर्श मानतात आणि त्यांच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करतात. पण अशी काही कपल्स देखील आहेत जी घटस्फोट घेतल्यानंतर देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकत्र आहेत. ते एकत्र पार्टी करतात आणि एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम देखील स्पेंट करतात.

या लिस्टमध्ये पहिले नाव येते ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांचे. दोघांनी 2000 मध्ये लग्न केले आणि 2014 मध्ये वेगळे झाले. विभक्त झाल्यानंतरही दोघांमध्ये खूप चांगले बाँडिंग आहे. दोघेही एकत्र क्वालिटी टाइम घालवतात. दोघेही त्यांच्या मुलांसाठी रिधान आणि रिहानसाठी एकत्र आहेत. ((Photo suzkr)

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लग्नाच्या 20 वर्षानंतर एकमेकांना घटस्फोट दिला. पण दोघेही मुलगा अरहानसाठी अनेकदा एकत्र दिसतात. अलीकडेच, दोघांचा एक व्हिडिओ-फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते त्यांचा मुलगा अरहानला विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि मुलाला निरोप दिला. (Photo ViralBhayani)

आमिर खान आणि किरण राव यांनी 2020 मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली होती. यानंतरही दोघे एकत्र काम करतात. दोघेही एकत्र क्वालिटी टाइम घालवतात. दोघांना एकत्र पाहून लोक अनेकवेळा गोंधळतात. दोघांना एक मुलगा आहे ज्याचे नाव आझाद आहे. (Photo kiranraokhan)

चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि अभिनेत्री कल्की कोचलिन यांच्यात वयाचं अंतर आहे. लग्नाच्या ३ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. विभक्त झाल्यानंतरही दोघांनी मैत्रीचे बंध कायम ठेवले आहेत.

पूजा भट्ट आणि मनीष माखिजा यांनी प्रेमविवाह केला. पण लग्नाच्या अनेक वर्षांनी दोघेही वेगळे झाले. मनीष हा व्हिडिओ जॉकी आहे. वेगळे झाल्यानंतरही दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. (Photo Youtube Videograb))

नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड यांनी लग्न केले नाही. पण वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता नीना यांनी त्याच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विवियन आणि नीना दोघेही संपर्कात राहिले. इतकेच नाही तर नुकतेच मसाबाच्या लग्नात विवियन रिचर्ड्स आले आहेत. ( Photo masabagupta)

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी दोघेही वेगळे झाले. सारा अली खान आणि इब्राहिम अली अशी या दोघांची मुले आहेत. विभक्त झाल्यानंतरही सैफचे सारा आणि इब्राहिमसोबत चांगले संबंध आहेत. (File photo)