मकरंद देशपांडेची मेव्हणीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, खऱ्या आयुष्यात ती आहे खूपच बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:12 IST2022-05-10T18:57:25+5:302022-05-10T19:12:08+5:30
Makrand Deshpande: हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे यांची पत्नी एका मराठी अभिनेत्रीची बहीण आहे.

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे(Makrand Deshpande)च्या पत्नीचे नाव निवेदिता पोहनकर (Nivedita Pohankar) असून तिची बहिणदेखील एक मराठी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव अदिती पोहनकर (Aditi Pohankar) आहे.
अदिती पोहनकर (Aditi Pohankar)ने आश्रम या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत काम केले आहे. यात तिने पहेलवान पम्मीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. आता या सीरिजचा तिसरा सीझन भेटीला येणार आहे. त्याचा मोशन व्हिडीओ अदितीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अदिती पोहनकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
अदिती पोहनकर खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
अदितीने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. सुरुवातीला ती देखील पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली होती. लव्ह सेक्स और धोका या हिंदी चित्रपटातून अदिती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली.
हिंदी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर अदितीने कुणासाठी कुणीतरी या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.
अदिती पोहनकर रितेश देशमुखसह 'लयभारी' या चित्रपटात झळकली होती. अदितीने या चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते.
या चित्रपटानंतर अदितीने ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले. यात मकरंद देशपांडेदेखील प्रमुख भूमिकेत होते.
त्यानंतर ती शी या वेबसीरिजमध्येही झळकली होती. तिच्या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. आता तिचा शी या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.
आदिती खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड असून तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते अक्षरशः फिदा होताना दिसतात.