Photos: जपानमध्ये 'धकधक गर्ल'चं खास फोटोशूट, पतीसोबत माउंट फूजीवर केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:56 IST2026-02-22T13:38:23+5:302026-02-22T13:56:28+5:30

जपानच्या निसर्गरम्य वातावरणात रमली माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धकधक गर्ल आणि आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने हे पॉवर कपल आहेत. वयाच्या साठीतही दोघं कपल गोल्स देतात.

सध्या माधुरी आणि डॉक्टर नेने जपानमध्ये फिरण्याचा आनंद लुटत आहेत. तेथील प्रसिद्ध माउंट फूजीवर ते पोहोचले. तिथलं डोळे दिपवणारं दृश्य त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दाखवलं आहे.

मागे माउंट फूजीचा तो भव्य बर्फाच्छादित डोंगर आणि समोर माधुरी पतीसोबत पोज देत आहे. दोघांनी उबदार कपडे परिधान केले आहेत.

माधुरीने उबदार स्कार्फ ओढला आहे. लाईट कलरचा स्वेटशर्ट घातला आहे. डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच गोड स्माईल आहे.

तर डॉ श्रीराम नेनेही कॅज्युअल अंदाजात दिसत आहेत. फुल टीशर्ट, जीन्स आणि गॉगलमध्ये त्यांचा स्मार्ट लूक दिसत आहे.

दोघांनी हातात हात घेत मस्त पोजही दिली आहे.

तसंच तेथील प्रसिद्ध पॅगोडासमोरही त्यांनी फोटोशूट केलं आहे. माधुरी लिहिते, 'अॅक्टिव्ह ज्वालामुखीच्या शिखरावरुन दिसणारे दृश्य जे परंपरांनी नटलेलं, परिसरातील अनेक मंदिरांमुळे प्रसन्न असलेलं, बर्फाने आच्छादलेलं आणि जपानच्या समुराईने नटलेलं आहे."

विशेष म्हणजे माधुरी आणि पतीने जपानची पारंपरिक वेशभूषाही परिधान केली आहे. माधुरीने केशरी रंगाचा पारंपरिक लांब बाह्यांचा 'युकाटा' घातला आहे.

या लूकमध्ये दोघांनी एकापेक्षा एक पोजही दिल्या आहेत. जपानमध्ये समुराई हा शब्द ऐतिहासिक योद्धा वर्गाशी निगडित आहे. यामुळे डॉ नेनेंनी हातात ती खास तलवारही घेतलेली दिसत आहे.