कुणाल कपूरप्रमाणेच 'या' सेलिब्रिटींनी बायकोच्या जाचाला कंटाळून घेतला काडीमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 01:39 PM2024-04-05T13:39:05+5:302024-04-05T13:51:06+5:30

Bollywood celebrities: कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पत्नीसोबत विभक्त होण्यापूर्वी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

सध्या प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. नुकताच कुणालने त्याच्या पत्नीपासून कायदेशीरित्या घटस्फोट घेतला आहे.

पत्नीने मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, कलाविश्वात असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून काडीमोड घेतला.

शिखर धवन- लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन याने त्याचा १० वर्षांचा संसार मोडला. लग्नाच्या १० वर्षानंतर त्याने पत्नी आयशा हिला घटस्फोट दिला.

आयशा मेंटली टॉर्चर करत असून मुलांना भेटू देत नाही असे आरोप शिखर धवन याने केले होते. शिखरने केलेले आरोप सिद्ध झाल्यानंतर शिखरने घटस्फोट घेतला.

जॉनी डीप - हॉलिवूड स्टार जॉनी डीप याचा घटस्फोट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला.

जॉनीच्या पत्नीने त्याच्यावर मारहाणीचे आरोप केले होते. परंतु, पत्नीने मानसिक त्रास दिल्याचा आरोप जॉनीनेही केला होता. यात जॉनी न्यायालयात खटला जिंकला आणि तो पत्नीपासून विभक्त झाला.

सैफ अली खान- बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांच्या घटस्फोटाविषयी सगळ्यांनाच माहित आहे.

सैफ आणि अमृताने लव्हमॅरेज केलं होतं. मात्र, लग्नाच्या काही महिन्यानंतर ते विभक्त झाले. अमृताचं सैफच्या आई आणि बहिणींशी पटत नसल्यामुळे घरात सतत वाद व्हायचे. याच कारणामुळे तो तिच्यापासून विभक्त झाल्याचं म्हटलं जातं.