'कोई मिल गया'मध्ये हृतिकसोबत दिसलेली क्यूट प्रिया आठवतेय? आता २१ वर्षांनंतर दिसते खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:32 IST2024-12-10T17:16:29+5:302024-12-10T17:32:21+5:30

२००३ साली आलेला कोई मिल गया सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमातील बालकलाकार आता काय करते जाणून घ्या (hansika motwani)

२००३ साली आलेला कोई मिल गया सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमात हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा यांनी काम केलेलं

सिनेमात हृतिक रोशनसोबत त्याचे शाळेतले छोटे मित्रही दिसले. या मित्रांमध्ये लक्षात राहिली ती क्यूट प्रिया. बालकलाकार हंसिका मोटवानीने ही भूमिका साकारली होती

९ ऑगस्ट १९९१ ला हंसिका मोटवानीचा जन्म झाला. तिचे वडील प्रदीप मोटवानी हे व्यावसायिक तर आई ही पेशाने डर्मिटोलॉजिस्ट आहे

हंसिकाने शाका लाका बूम बूम, क्यूकी साँस भी कभी बहू थी या सुप्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं. कोई मिल गया सिनेमात काम करुन हंसिकाला खरी ओळख मिळाली.

मुंबईतील प्रसिद्ध पोडोर आंतरराष्ट्रीय शाळेत हंसिकाने शिक्षण घेतलं. या शाळेत अनेक स्टारकिड्सने शिक्षण घेतलंय.

हंसिका अजूनही अभिनयक्षेत्रात सक्रीय असून कोई मिल गया रिलीजनंतर २१ वर्षांनी हंसिका आता खूपच ग्लॅमरस दिसतेय.

हंसिकाने बॉलिवूड गाजवलंच शिवाय ती साउथ मनोरंजन विश्वातही सक्रीय आहे. 'मप्पिल्लाई', 'एन्जेयुम कड्हल वेलायुधम' अशा साउथ सिनेमांमध्ये तिने काम केलंय