गुलाबाची कळी... कियारा आडवाणीचं देखणं रुप, हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 16:30 IST2024-11-10T16:24:20+5:302024-11-10T16:30:36+5:30

एका पेक्षा एक पोझ देत कियाराने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी.

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

गुलाब प्रिंटेड व्हाईट रंगाच्या ड्रेसवर कियारा अगदी सुंदर दिसतेय.

एका पेक्षा एक पोझ देत कियाराने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

या फोटोंमध्ये कियारा कमालीची हॉट दिसते आहे. तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

कियारा सध्या गेम चेंजर सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती राम चरणसोबत झळकणार आहे.

पुढील वर्षी संक्रांतीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

कियाराने बॉलिवूडसह दक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी, कबीर सिंग आणि भूल भुलैया 2 यासारख्या मोठ्या चित्रपटांत ती लीड रोलमध्ये झळकलेली आहे.

शानदार अभिनयाने कियाराने लोकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.