KGF 2च्या यशानंतर फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय रॉकी भाई, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 01:34 PM2022-04-29T13:34:46+5:302022-04-29T13:45:19+5:30

गेल्या 14 एप्रिलला ‘केजीएफ 2’ रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या त्सुनामीत जर्सी व बीस्ट सारख्या सिनेमांचीही पार वाताहत झाली. ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला.सध्या रॉकी भाई म्हणजेच यश पत्नी आणि मुलांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय.

‘केजीएफ’ला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यामुळे मेकर्सनी ‘केजीएफ 2’ (KGF: Chapter 2) बनवण्याचा निर्णय घेतला. गेल्या 14 एप्रिलला ‘केजीएफ 2’ रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या त्सुनामीत जर्सी व बीस्ट सारख्या सिनेमांचीही पार वाताहत झाली. ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. 12 दिवसांत या चित्रपटाने वर्ल्डवाईड 907.30 कोटींची कमाई केली. ‘केजीएफ 2’ लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. सध्या रॉकी भाई म्हणजेच यश पत्नी आणि मुलांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय.( Photo Instagram)

व्हॅकेशनचे फोटो यशची पत्नी राधिका पंडितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर राधिकाची फॅन फॉलोइंग पती यशपेक्षा कमी नाही. तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात. (Photo Instagram)

राधिका आणि यश यांना दोन मुलं आहेत. अनेकदा त्यांच्या मुलांसोबत फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram)

राधिकासाठी तिची पहिली मालिका 'नंदा गोकुळा' खूप खास आहे कारण तिने या मालिकेतून पदार्पण केले होते आणि या मालिकेच्या सेटवर ती पहिल्यांदाच यशला भेटली होती. (Photo Instagram)

एकत्र काम करत असताना राधिका आणि यश यांची मैत्री झाली आणि नंतर हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram)

राधिका आणि यश यांनी त्यांचे नाते सीक्रेट ठेवले आणि त्यांनी अगदी खाजगी पद्धतीने लग्नही केले. (Photo Instagram)