Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:13 IST2025-06-17T19:04:51+5:302025-06-17T19:13:48+5:30
Kareena Kapoor And Shahid Kapoor : करीना शाहिदच्या मागे वेडी झाली होती आणि तिनेच स्वत: ही गोष्ट सांगितली आहे.

अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहीत आहे. करीनाने डेटिंगच्या दिवसामध्ये आपलं प्रेम कसं व्यक्त केलं ते आता समोर आलं आहे.
करीना शाहिदच्या मागे वेडी झाली होती आणि तिनेच स्वत: ही गोष्ट सांगितली आहे. करण जौहरच्या चॅट शोमध्ये दोघांनाही इनव्हाईट करण्यात आलं होतं.
अभिनेत्री आता सैफ अली खानची पत्नी आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा ती शाहिदवर प्रचंड प्रेम करायची. तीच त्याच्या मागे लागल्याचं देखील तिने म्हटलं आहे.
करीनाने करण जौहरच्या शोमध्ये शाहिदच्या समोरच म्हटलं होतं की, "त्याला काहीच फरक पडायचा नाही. मी दोन महिने शाहिदच्या मागे लागली होती."
"मी पहिली व्यक्ती होती, जी इतका इंट्रेस्ट घेत होती आणि पुढे जात होती. मी त्याला खूप सारे SMS करायची. मी कॉल करून त्याला भेटूया असं म्हणायची."
करणने यावर शाहिदची रिएक्शन विचारताच शाहिद खूप लाजला. करीना आणि शाहिदचं ब्रेकअप होऊन आता खूप जास्त वर्षे झाली आहे. दोघंही आपल्या आयुष्यात खूश आहेत.
करीनाने सैफ अली खानशी लग्न केलं आहे. शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केलं. दोघांनाही आता दोन मुलं आहेत.
करीना आणि शाहिद दोघंही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. दोघांचेही असंख्य चाहते आहेत.