IN PICS : बाबो! हे आहेत बॉलिवूडचे सर्वात श्रीमंत दिग्दर्शक, इतकी आहे संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 08:00 AM2022-06-08T08:00:00+5:302022-06-08T08:00:01+5:30

The Richest Bollywood Directors In India : बॉलिवूडच्या श्रीमंतीची चर्चा सतत होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची संपत्ती आहे. दिग्दर्शकही मागे नाहीत....

बॉलिवूडच्या श्रीमंतीची चर्चा सतत होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची संपत्ती आहे. दिग्दर्शकही मागे नाहीत....

करण जोहर याचंच उदाहरण घ्या. त्याच्या श्रीमंती थाटाचं दर्शन नेहमी घडत असतंच. बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारा, धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा असलेल्या करणकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण तो 1 हजार 500 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

पीके, थ्री इडियट्स असे वेगळ्या धाटणीचे अप्रतिम सुंदर सिनेमे देणारे दिग्दर्शक राजकुमार हिराणी साधं आयुष्य जगतात. पण त्यांची संपत्ती कमी नाही. रिपोर्टनुसार, राजकुमार हिराणी यांच्याकडे 1 हजार 300 कोटींची संपत्ती आहे.

संजय लीला भन्साळी हे कोणाला माहित नाही. लार्जर दॅन लाईफ सिनेमे बनवणाºया भन्साळींचे सिनेमे जणू वेड लावतात. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे माहितीये? तर ते 940 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

अनुराग कश्यप हा वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी ओळखला जातो. ब्लॅक फ्रायडे, गँग्स ऑफ वासेपूर, देव डी असे सिनेमे देणारा अनुराग हा 850 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

मेघना गुलजार ही एक लोकप्रिय दिग्दर्शिका. राजी, छपाक असे अप्रतिम चित्रपट दिग्दर्शित करणारी मेघना ही 830 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

कबीर खान हेही बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक़ संपत्तीच्या बाबतीतही ते मागे नाहीत. बजरंगी भाईजान, 83 असे सिनेमे दिग्दर्शित करणाºया कबीर खान यांच्याकडे एकूण 341 कोटींची संपत्ती आहे.

लाइफ इन अ मेट्रो, बर्फी, जग्गा जासूस असे हिट बॉलिवूड चित्रपट बनवणारे दिग्दर्शक अनुराग बासू यांची एकूण संपत्ती 330 कोटींच्या घरात आहे.

अ‍ॅक्श्नन चित्रपटांसाठी ओळखला जाणारा बॉलिवूड दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. कधीकाळी रोहित शेट्टी अभिनेत्रींच्या साड्या प्रेस करायचा. आता तो 290 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

बाहुबली, बाहुबली 2, आरआरआर असे एकापेक्षा एक सुपरडुपर हिट सिनेमे देणारे साऊथचे लोकप्रिय दिग्दर्शक कमालीचं साधं आयुष्य जगतात. ते 110 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.