तब्बल ४८ कोटी रूपये लावून तयार झालं कंगनाचं हे ऑफिस, बघा आतून कसं दिसतं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 10:19 IST2020-09-08T10:05:10+5:302020-09-08T10:19:10+5:30
कंगनाने या ऑफिस तयार करण्यासाठी मुंबईच्या पाली हिल येथील बंगलो नंबर ५ ला पूर्णपणे री-कन्ट्रक्शन केलंय. आणि याला वर्क स्टुडिओ बदललं आहे.

कंगना रनौत ही नेहमीच आपल्या वादग्रस्त कमेंट्समुळे चर्चेत असते. तिने इंडस्ट्रीमध्ये फार कमी काळात मोठं यश मिळवलंय. कंगना एकदा म्हणाली होती की, जेव्हा ती निर्माती होईल तेव्हा तिचं स्वत:चं ऑफिस असेल. आणि १५ वर्षांच्या मेहनतीनंतर ती एका शानदार ऑफिसची मालक झाली.
कंगनाचं हे ऑफिस चांगलंच चर्चेत आहे. तिने ट्विट करून सांगितलं होतं की, तिच्या या ऑफिसवर बीएमसीचा छापा पडला आहे. तसेच तिने हेही सांगितले की, तिने कोणतंही अवैध्य निर्माण केलेलं नाही. कंगना सध्या तिच्या होमटाउनला आहे आणि ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे.
कंगनाच्या प्रॉडक्शन हाउसचं नाव 'मणिकर्णिका फिल्म्स' ठेवलं आहे आणि हे नाव तिने २०१९ मध्ये आलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'च्या सन्मानात ठेवलं होतं. कंगनाने हा सिनेमा को-डायरेक्ट केला होता.
कंगनाने या ऑफिस तयार करण्यासाठी मुंबईच्या पाली हिल येथील बंगलो नंबर ५ ला पूर्णपणे री-कन्ट्रक्शन केलंय. आणि याला वर्क स्टुडिओ बदललं आहे.