कमल हासन यांची लेक श्रुती हासनचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर झाला व्हायरल, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 06:00 AM2021-02-27T06:00:00+5:302021-02-27T06:00:00+5:30

श्रुती हासन दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी आहे. श्रुती बॉलिवूड चित्रपटाशिवाय टॉलिवूड, कॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रीय आहे.

नुकतेच श्रुती हासनने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्रुती हासनने जीन्सचा स्कर्टसोबत शॉर्ट टॉप आणि ओपन शर्ट परिधान केले आहे.

श्रुती हासनचा हा लूक चर्चेत आला आहे.

श्रुती हासनने वयाच्या ६ व्या वर्षी सिंगिंग क्षेत्रातून करिअरला सुरूवात केली होती. तिचा आवाज वडिलांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट चाची ४२०मध्ये ऐकायला मिळाला होता.

त्यानंतर श्रुती सिंगिगमध्ये करिअर बनवण्यासाठी आणि सिंगिगचे शिक्षण घेण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेली.

श्रुती हासनचा लक हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.

श्रुती हासन आगामी चित्रपट वेलकम बॅकमध्ये दिसणार आहे. यात ती जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.

श्रुती हसनचे इंस्टाग्रामवर १५.९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.