'पू' पेक्षा मालविका हॉट, 'कभी खुशी कभी गम'मध्ये साकारली होती भूमिका, २० वर्षानंतर इतकी दिसते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 02:37 PM2021-01-07T14:37:25+5:302021-01-07T14:45:33+5:30

'कभी खुशी कभी गम'मध्ये बालपणीची 'पू' साकारलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे मालविका राज. मालविका सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. बघावं तेव्हा तिचे नवीन नवीन अॅक्टीव्हीटी करत असल्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालविकाचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.

मलाविका गेल्या काही काळापासून मॉडेलिंगच्या विश्वात सक्रिय असून तिने अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी मॉडेलिंगही केलं आहे.

तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे मालविकाचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.

अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.