एका गाण्याने रातोरात स्टार झाली, पण अचानक बॉलिवूड सोडलं; कुठे गायब झाली 'जुम्मा चुम्मा' गर्ल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:31 IST2026-02-09T13:16:07+5:302026-02-09T13:31:40+5:30

ओळखलंत का या अभिनेत्रीला?

अमिताभ बच्चन यांचं 'जुम्मा चुम्मा दे दे' आठवत असेलच. या गाण्यात दिसलेली अभिनेत्री किमी काटकर कुठे आहे? हिंदी सिनेमाची 'टार्झन गर्ल' म्हणूनही तिची ओळख होती.

सध्या किमी काटकर कुठे आणि काय करते? आता तिला ओळखणंही कठीण आहे. अभिनेत्री आता या राज्यात अज्ञात आयुष्य जगत आहे.

किमी काटकरने वयाच्या २० व्या वर्षी १९८५ साली 'पत्थर दिल' मधून पदार्पण कें होतं. या सिनेमात ती सहायक अभिनेत्री होती. मात्र त्याच वर्षी आलेल्या 'अॅडव्हेंचर्स ऑफ टार्झन'ने तिला खरी ओळख दिली. ती रातोरात स्टार झाली.

टार्जन गर्ल अशी तिची ओळख बनली. तिने सिनेमात बोल्ड सीन आणि बिकिनी सीन दिले होते. त्यानंतर तिच्याकडे सिनेमांच्या रांगा लागल्या होत्या.

१९८८ ते १९९० काळात तिने ३५ पेक्षा जास्त सिनेमे केले. १९८९ साली तिने १५ सिनेमांमध्ये काम केलं आणि प्रत्येक सिनेमात चांगलं परफॉर्म केलं.

'मेरा लहू', 'मुल्जिम', 'रामा ओ रामा', 'धर्मयुद्ध', 'तोहफा मोहोब्बत का', 'सोने पर सुहागा', 'कहां है कानून' या सिनेमांचा त्यात समावेश आहे.

किमीला खरी लोकप्रियता 'हम' या सिनेमातून मिळाली. तर ती शेवटची १९९२ साली 'हमला' सिनेमात दिसली. १९९२ मध्ये तिने प्रोफेशनल फोटोग्राफर आणि निर्माते शंतनू शौरीशी लग्न केलं आणि सर्व काही सोडून ती ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाली. त्यांना सिद्धांत हा मुलगाही आहे.

किमी कुटुंबासोबत सुमारे ५ वर्षे ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहिली आणि आता ती बऱ्याच काळापासून गोव्यात आहे. तिचे पती शांतनु हे गोव्यातील The One School Goa चे संस्थापक आहेत.