90 कोटींचे दागिने, १३० कोटी रुपये बँकेत अन्...; जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती माहीत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 12:14 PM2024-02-15T12:14:51+5:302024-02-15T12:40:40+5:30

कार कलेक्शन ते शेअर्समध्ये कोटींची गुंतवणूक; जया बच्चन-अमिताभ बच्चन आहेत कोट्यवधींचे मालक

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. अभिनेत्री असण्याबरोबरच त्या समाजवादी पार्टीच्या खासदारही आहेत.

जया बच्चन यांनी नुकतीच निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या २०२२-२३ वर्षातील कमाईबाबत सांगितलं आहे.

७५ वर्षांच्या जया बच्चन यांनी गेल्या वर्षात १ कोटी ६३ लाख रुपयांची कमाई केल्याचं यात म्हटलं आहे. तर अमिताभ बच्चन यांनी तब्बल २७३ कोटींची कमाई केली आहे.

जया बच्चन यांच्या बँक खात्यात १० कोटी ११ लाख रुपये तर ५७ हजारांची रोकड आहे. बिग बी यांच्याकडे १२ लाखांची रोख रक्कम आणि १२० कोटी ४५ लाख रुपये बँक खात्यात जमा आहेत.

शेअर्समध्ये जया बच्चन यांनी ५ कोटींची गुंतवणूक केली आहे. तर अमिताभ यांनी १८२ कोटींहून अधिक रक्कम शेअर्समध्ये गुंतवले आहेत.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे अनुक्रमे ४०कोटी आणि ५४ कोटी किमतीचे दागिने आहेत.

बच्चन दाम्पत्याकडे बीएमडब्लू, मर्सिडीज या लक्झरियस गाड्याही आहेत. बिग बींकडे १७ कोटींचं कार कलेक्शन आहे. तर जया बच्चन यांच्या नावे ९ लाखांची वाहने आहेत.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती १ हजार ५७८ कोटी इतकी आहे.