जान्हवी कपूरचं मनमोहक सौंदर्य; फोटो होतायत व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 18:16 IST2024-03-10T18:03:26+5:302024-03-10T18:16:07+5:30
जान्हवी कपूर हिच्या साडीत दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
जान्हवीने तिचे नवीन लुक सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधते.
जान्हवीकडे पाहिल्याने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येते. जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर फिकट निळ्या रंगाच्या सुंदर साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरने कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या सुंदर साडीवर जान्हवीने डीपनेक ब्लाऊज कॅरी केले आहे. या स्लिव्हलेस ब्लाऊजने तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली आहे.
यावेळी जान्हवीने निळ्या रंगाला साजेसे असे झुमके कॅरी केले. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली होती.
जान्हवीने या साडीसह तिचे केस मोकळे सोडले होते.
या लुकसाठी जान्हवीने बोल्ड मेकअप केला होता. या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती.