PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवी कपूरच्या Look ने लावलंय साऱ्यांना वेड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:18 PM2024-05-24T16:18:02+5:302024-05-24T16:38:16+5:30

PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवी कपूरच्या Look ने लावलंय साऱ्यांना वेड!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी भेटी देत आहे. यादरम्यान तिचे अनेक स्टनिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री तिच्या स्टायलिश ड्रेसिंग सेन्सने तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. या फोटोत जान्हवी क्लासी साडी लूकमध्ये दिसतेय.

सोशल मीडियावर जान्हवीचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांना तिचे फोटो पसंत पडत आहेत.

नुकताच जान्हवीने प्रमोशन दरम्यान आकर्षक पोशाख परिधान केला आहे. जान्हवीकडे पाहिल्याने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येत आहे.

जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर पांढऱ्या आणि फिकट निळ्या रंगाच्या सुंदर लेंहेग्यामधील काही फोटो शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सुंदर साडीवर जान्हवीने नाजूक गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे.

या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरने कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.

जान्हवीने या साडीसह तिचे केस मोकळे सोडले होते. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली.

या लुकसाठी जान्हवीने हलका मेकअप केला होता. या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.