Jacqueline Fernandez: २०० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिनला कोर्टाने दिली परदेशात जाण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 18:06 IST2023-01-27T17:43:16+5:302023-01-27T18:06:11+5:30
२०० कोटींच्या मनी लॉंडरिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस चौकशीच्या फेऱ्यात आहे. जॅकलिनने कोर्टाकडे परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती.

दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दुबईला जाण्याची परवानगी दिली. (फोटो- पीटीआय)
एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने परदेशात जाण्याची परवानगी मागणाऱ्या जॅकलिनच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. (फोटो- इंस्टाग्राम)
याप्रकरणी सविस्तर आदेशाची प्रतीक्षा आहे. जॅकलीन ही २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
जॅकलीन कित्येक महिन्यांपासून ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहे. तिचे आणि सुकेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
आरोपी सुकेशने जेलमधून लिहिलेल्या पत्रात हे नमुद केले की त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. म्हणून त्याने महागडे गिफ्ट्स दिले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
यामध्ये जॅकलिन चा किंवा तिच्या कुटुंबाचा दोष नाही. (फोटो इन्स्टाग्राम)