'जाने तू... या जाने ना' फेम अभिनेत्री मंजिरी फडणीसचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:34 IST2024-09-21T15:12:54+5:302024-09-21T15:34:46+5:30
Manjiri Fadnis : 'जाने तू... या जाने ना' फेम अभिनेत्री मंजिरी फडणीसने नुकतेच मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे.

'जाने तू... या जाने ना' चित्रपटातून अभिनेत्री मंजिरी फडणीसला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

मंजिरी फडणीस सिनेमात जास्त सक्रीय नाही. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

मंजिरी फडणीस हिने नुकतेच गुलाबी साडीत फोटोशूट केले आहे.

यात तिने गुलाबी साडीवर केसांचा आंबाडा बांधला आहे आणि नाकात नथ घातली आहे.

मंजिरी फडणीसचा मराठमोळा लूक चाहत्यांना भावतो आहे.

मंजिरी कपिल शर्मासोबत किस किस को प्यार करुमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ग्रॅण्ड मस्तीमध्येही झळकली आहे.

मंजिरीने मराठी सिनेमातही काम केले आहे.

















