'राम तेरी गंगा मैली'मधली निळ्या डोळ्यांची मंदाकिनी आता कशी दिसते?, फोटो पाहून तिला ओळखणं ही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 01:12 PM2023-05-19T13:12:11+5:302023-05-19T13:31:24+5:30

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून अभिनेत्री मंदाकिनीला खूप लोकप्रियता मिळाली. आता मंदाकिनीला ओळखणं कठीण झालं आहे.

मंदाकिनी 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून त्यांनीकरिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने जवळपास ४५ चित्रपटांमध्ये काम केले.

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या मंदाकिनीला कोण ओळखत नाही. राजीव कपूरसोबत या चित्रपटातून तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

प्रत्येकाला तिने तिच्या निळ्या डोळ्यांनी वेड लावले होते. राज कपूर दिग्दर्शित हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

या चित्रपटात तिच्या पांढऱ्या रंगाची साडी नेसून धबधब्याखाली आंघोळ करतानाचा सीन खूप चर्चेत आला होता. हा चित्रपट पाहून प्रत्येकजण तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले होते.

मंदाकिनीची कारकीर्द चांगलीच सुरू असताना अचानक एका व्हायरल झाला आणि तिच्या आयुष्यात वादळ आलं. तो फोटो होता अभिनेत्री मंदाकिनी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा.

१९९४ मध्ये दुबईच्या क्रिकेट स्टेडिअमध्ये दाऊद इब्राहिमबरोबर मंदाकिनी स्पॉट झाली. तिथला दोघांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. हा फोटो केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाही तर संपूर्ण देशात व्हायरल झाला होता. याचा परिणाम अखेर मंदाकिनीच्या करिअरवर झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, दाऊद मंदाकिनीच्या सौंदर्यावर फिदा होता. तो मंदाकिनीला त्याच्या आयुष्याची जोडीदार करू इच्छित होता.

मंदाकिनीला सिनेमात काम मिळावे यासाठी तो लोकांना धमक्या देऊ लागला. याच कारणामुळे मंदाकिनीला कोणी काम द्यायला तयार नव्हते.

या वीकेंडला ती द कपिल शर्मा शोमध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत संगीता बिजलानी आणि वर्षा उसगांवकर या शोमध्ये दिसणार आहेत.

वयाच्या ५९ व्या वर्षीही मंदाकिनी खूपच सुंदर दिसते. लोक आजही मंदाकिनीच्या सौंदर्याचे फॅन आहेत.

मंदाकिनीने आपल्या कारकिर्दीत जवळपास 45 चित्रपटांमध्ये काम केले होते. 1996 मधला 'जोरदार' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.