KGF 2 : ‘रॉकीभाई’ला वेड लावणारी श्रीनिधी शेट्टी आहे तरी कोण? वाचा तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:00 PM2022-04-04T17:00:32+5:302022-04-04T17:05:42+5:30

KGF 2 : ‘केजीएफ 1’ हा श्रीनिधीचा पहिला सिनेमा होता. पहिलाच सिनेमा सुपरडुपर हिट झाला आणि श्रीनिधी एका रात्रीत स्टार झाली

‘केजीएफ 2’ या सिनेमाची चाहते आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे. साहजिकच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

चित्रपटात सुपरस्टार यश आहे. रवीना टंडन आहे.संजय दत्तही आहे. याशिवाय श्रीनिधी शेट्टी हा आणखी एक गोड चेहरा देखील आहे. ‘केजीएफ 1’मध्ये सुद्धा ती दिसली होती.

ही श्रीनिधी कोण? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर श्रीनिधी ही मॉडेलिंग दुनियेतील एक मोठं नाव आहे. अनेक ब्युटी कॉन्स्टेस्ट तिनं जिंकलेत.

2016 साली ‘मिस दिवा सुपरनॅशनल’ जिंकल्यानंतर ‘मिस सुपरनॅशनल’ ही सौंदर्य स्पर्धाही तिनं जिंकली. ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी ती दुसरी भारतीय मॉडेल ठरली.

मिस साऊथ इंडिया, मिस कर्नाटक, मिस ब्युटिफुल स्माईल असे अनेक खिताब तिनं पटकावले. मॉडेलिंगच्या दुनियेत तिचं मोठं नाव झालं आणि तिला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या.

‘केजीएफ 1’ हा तिचा पहिला सिनेमा होता. पहिलाच सिनेमा सुपरडुपर हिट झाला आणि श्रीनिधी एका रात्रीत स्टार झाली. या चित्रपटात ती रीनाची भूमिका साकारतेय.

‘केजीएफ 1’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर श्रीनिधीला अनेक मोठे सिनेमे ऑफर झाले. तिला साईन करण्यासाठी निर्मात्यांच्या जणू रांगा लागल्या.

पण श्रीनिधीला ‘केजीएफ 2’ हातचा जाऊ द्यायचा नव्हता. या चित्रपटासाठी तिने 7 मोठ्या सिनेमांना नकार दिला.