'हेरा फेरी'चा दिग्दर्शक प्रियदर्शनची मुलगीही आहे लोकप्रिय अभिनेत्री; गाजवतेय साउथ इंडस्ट्री
By देवेंद्र जाधव | Updated: October 3, 2025 16:13 IST2025-10-03T15:49:17+5:302025-10-03T16:13:55+5:30
'हेरा फेरी', 'भूल भूलैय्या', 'चूप चूप के' अशा लोकप्रिय विनोदी सिनेमांचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांची लेक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे फार कमी जणांना माहितीये. जाणून घ्या

२००० साली आलेला 'हेरा फेरी' हा सिनेमा चांगलाच गाजला. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या तिघांची अफलातून भूमिका या सिनेमात होती. प्रियदर्शन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
फार कमी लोकांना माहितीये की, बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन यांची लेक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इतकंच नव्हे ही अभिनेत्री साउथ इंडस्ट्री गाजवतेय.
या अभिनेत्रीचं नाव आहे कल्याणी प्रियदर्शन. ५ एप्रिल १९९३ रोजी चेन्नई येथील तामिळनाडू येथे कल्याणीचा जन्म झाला.
न्यूयॉर्कमधील पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइन (Parsons School of Design) मधून 'बॅचलर ऑफ आर्किटेक्चर' (BArch) मध्ये कल्याणीने पदवी घेतली आहे. पण नंतर सिनेसृष्टी तिला भुरळ घालत होती.
सुरुवातीला, तिने हृतिक रोशनच्या 'क्रिश ३' या हिंदी चित्रपटासाठी सहाय्यक प्रॉडक्शन डिझायनर (Assistant Production Designer) म्हणून काम केलं. नंतर मात्र तिने साउथ इंडस्ट्रीची वाट धरली आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
कल्याणीने २०१७ मध्ये तेलुगू चित्रपट 'हॅलो' (Hello) मधून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. पुढे 'हृदयम', 'हिरो', 'ब्रो डॅडी' अशा मल्याळम आणि तेलुगु सिनेमात तिने काम केलं.
अलीकडेच कल्याणीची भूमिका असलेला 'लोका चाप्टर १- चंद्रा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. कल्याणी दिसायला खूप सुंदर आहे. वडिलांनी दिग्दर्शनात तर लेकीने अभिनयात बाजी मारली आहे.