Hema Malini : "रोज रात्री कोणीतरी माझा गळा दाबतंय..."; हेमा मालिनींनी सांगितला थरकाप उडवणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:06 IST2026-01-07T16:39:23+5:302026-01-07T17:06:23+5:30

Hema Malini : एक काळ असाही होता जेव्हा हेमा मालिनी अशा एका घरात राहत होत्या, जिथे त्यांना दररोज रात्री गुदमरल्यासारखं वाटायचं.

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी सध्या जुहू येथील त्यांच्या आलिशान बंगल्यात राहतात. जोपर्यंत धर्मेंद्र या होते, तोपर्यंत ते त्यांना भेटायला येत असत. मात्र एक काळ असाही होता जेव्हा हेमा मालिनी अशा एका घरात राहत होत्या, जिथे त्यांना दररोज रात्री गुदमरल्यासारखं वाटायचं.

हेमा मालिनी चेन्नईहून मुंबईत आल्या होत्या आणि एका अपार्टमेंटमध्ये राहण्याची सवय करून घेत होत्या, जे त्यांना कधीच आवडलं नाही. पण त्यानंतर त्यांना असं एक घर मिळालं, जिथे त्यांना कोणीतरी आपला गळा दाबत असल्याचा भास व्हायचा.

राम कमल मुखर्जी यांच्या 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात हेमा मालिनी यांनी राज कपूर यांच्यासोबतच्या 'सपनों का सौदागर' या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

त्यांनी सांगितलं की, त्या दिवसांत त्या वांद्रे येथील एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या, ज्याचा वापर कॉस्च्युम डिझायनर भानु अथैया ड्रेस ट्रायलसाठी करत असत. त्यानंतर त्यांना एका बंगल्यात राहण्यासाठी जागा मिळाली, पण तो बंगला 'भुताचा' असल्याचं मानलं जात असे.

त्यांनी सांगितलं की, त्या दिवसांत त्या वांद्रे येथील एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या, ज्याचा वापर कॉस्च्युम डिझायनर भानु अथैया ड्रेस ट्रायलसाठी करत असत. त्यानंतर त्यांना एका बंगल्यात राहण्यासाठी जागा मिळाली, पण तो बंगला 'भुताचा' असल्याचं मानलं जात असे.

हेमा मालिनी यांनी त्याच पुस्तकात पुढे म्हटलं आहे की, "दररोज रात्री मला असं वाटायचं की, कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मला श्वास घेण्यास खूप त्रास व्हायचा."

"मी माझ्या आईसोबत झोपत असे आणि मला किती अस्वस्थ वाटतेय हे तिनेही पाहिलं होतं. जर असं एकदा-दोनदा झालं असतं तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण हे दररोज रात्री घडत होतं."

"या अनुभवानंतरच मुंबईत स्वतःचं पहिलं अपार्टमेंट विकत घेतलं. मला आठवतेय धरम जी (धर्मेंद्र) घरी कॉफी पिण्यासाठी यायचे, पण तेव्हा मला याची अजिबात कल्पना नव्हती की मी त्यांच्या प्रेमात पडेन आणि त्यांच्याशी लग्न करेन."

हेमा मालिनी यांनी १९७२ मध्ये आपला पहिला बंगला विकत घेतला, जेव्हा त्या 'सीता और गीता' चित्रपटाचं शूटिंग करत होत्या.

"तो पाच वर्षे जुना बंगला होता आणि एका गुजराती व्यक्तीचा होता. आम्ही नंतर त्या घरात आणखी काही खोल्या बांधल्या. मला ते घर खूप आवडायचं कारण त्याच्या सभोवताली खूप झाडं होती" असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे