हार्दिक पांड्याची EX पत्नी थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, हे फोटो पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:10 IST2026-03-16T18:06:35+5:302026-03-16T18:10:26+5:30

हार्दिक पांड्याच्या EX पत्नीकडून थायलंड ट्रीपचे खास फोटो शेअर, गुलाबी बिकिनीत दिसतेय प्रचंड हॉट

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची EX पत्नी आणि मॉडेल अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आली आहे.

नताशा स्टँकोव्हिचने सोशल मीडियावर गुलाबी बिकनीमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा 'बोल्ड' आणि 'रिलॅक्स्ड' लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

नताशा सध्या मुलगा अगस्त्यसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. नताशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत बसून दिलेली तिची पोज आणि मोकळे केस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

तिने काळ्या रंगाच्या सनग्लासेससह आपला लूक पूर्ण केला आहे. या फोटोंना तिने "मला येथे स्वर्ग सापडला" असे कॅप्शन दिले आहे.

सुट्टीदरम्यान नताशाने तिथल्या खाद्यपदार्थांचाही पुरेपूर आस्वाद घेतला.

स्विमिंग पूलजवळ तिने दिलेल्या 'कॅन्डीड' पोजमध्ये ती खूपच फ्रेश आणि ग्लॅमरस दिसत आहे.

अनेकांनी तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिला "खरी अप्सरा" असे म्हटले आहे.

हार्दिक पंड्यापासून वेगळे झाल्यानंतर नताशा सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाली आहे. नताशा नेहमीच सोशल मीडियावर तिचे ट्रॅव्हल, फिटनेस आणि फॅशनशी संबंधित फोटो शेअर करत असते.

हार्दिक सध्या माहिका शर्माला डेट करत आहे. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये माहिका हार्दिकला चिअर करताना दिसली होती.