वसीम अक्रम ते ललित मोदींपर्यंत! या 8 जणांशी जोडलं गेलंय माजी मिस युनिव्हर्सचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 06:58 PM2022-11-21T18:58:25+5:302022-11-21T19:05:42+5:30

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्त्वामुळे अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच चढ-उतारांनी भरलेले होते. तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अभिनेत्रीचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे.

या अभिनेत्रीचे नाव आधी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले होते. त्यावेळी सुष्मिता सेनचे वय 20-21 च्या आसपास होते. 1996 मध्ये 'दस्तक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिची विक्रम भट्ट यांच्याशी भेट झाली आणि इथून एक अनोखी कहाणी सुरू झाली. मात्र विक्रम भट्टा विवाहित असल्यामुळे ही गोष्ट लगेच संपली.

यानंतर 'कर्मा और होली'च्या वेळी सुष्मिताची भेट बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा यांच्याशी झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुष्मिता आणि रणदीप जवळपास 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर खूप चर्चेत होत्या. मात्र त्यानंतर दोघेही वेगळे झाले.

या यादीत पुढचे नाव येते ते म्हणजे सोहेल खानची आधीची पत्नी सीमा सचदेवचा भाऊ आणि सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सचदेव याचे. सुष्मिता आणि बंटी अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. बंटी त्यावेळी सुष्मिताचा मॅनेजर होता आणि अशा परिस्थितीत त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मात्र हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे सांगत दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

खरं तर एकेकाळी उद्योगपती इम्तियाज खत्री आणि सुष्मिता सेन यांच्या लिंकअपची बातमीही वेगाने पसरली होती. दोघेही पडद्यामागे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात होते. मात्र अभिनेत्रीने नेहमीच या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले आहे.

'दुल्हा मिल गया' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुष्मिता आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला होता. असे म्हटले जाते की, सुष्मिता मुदस्सरच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की ती त्याच्या घरी राहू लागली. मात्र हे नातेही फार काळ टिकले नाही आणि काही काळाने दोघे वेगळे झाले.

पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू वसीम अक्रम आणि सुष्मिता सेन यांची पहिली भेट 2008 मध्ये 'एक खिलाडी एक हसीना' या रिॲलिटी शोच्या सेटवर झाली होती. येथूनच दोघांचे प्रेम झाले. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे भाष्य केले नाही. कालांतराने दोघेही लवकरच वेगळे झाले.

सुष्मिता सेनसोबतचे प्रेम जाहीर करून आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी जगभरात खळबळ उडवून दिली होती. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर खळबळ माजली होती. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नंतर हे उघड झाले की त्यांनी लग्न केले नाही, परंतु ते एकमेकांना डेट करत होते. यानंतर सुष्मिता सेनलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

ललित मोदी यांनी केलेल्या दाव्याच्या आधी सुष्मिता सेन तिचा प्रियकर रोहमन शॉलला डेट करत होती. दोघेही जवळपास 2 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. रोहमनचे सुष्मिताच्या मुलींसोबतही चांगले संबंध आहेत. मात्र मागील वर्षाच्या अखेरीस सुष्मिताने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या ब्रेकअपची घोषणा केली होती.